Welcome To Aatma Mandir
आत्मा व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र
आजची तरुण पिढी अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकत चालले आहेअसे निदर्शनात आले, व्यसनामुळे कौटुंबिक आर्थिक सामाजिक स्थिती मध्येहोणारी फडफड बघून अस्वस्थ झालो. त्यासाठी विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून सन 2017 मध्ये आत्मा व्यसनमुक्ती केंद्र व पुनर्वसन केंद्राची स्थापना करण्यात आली. आज पर्यंत म्हणजे 2022 पर्यंत 865 रुग्णांना सेवा देऊन व्यसनमुक्त केली याचा मला मनस्वी अभिमान आहे. " आत्मा वृद्ध सेवा मंदिर " व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून काम करत असताना वृद्ध लोकांचेहोणारेहाल -अपेष्टा त्यांची फडफड नजरेस आली, कुटुंब व्यवस्थेचा सर्वात जास्त विघातक परिणाम हा वृद्धांवर झाला म्हणून सन 2020 मध्येआत्म वृद्ध सेवा मंदिराची स्थापना करण्यात आली. आजपर्यंत म्हणजे 2022 पर्यंत 42 वृद्धांची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले. " आत्मा बाल विकास मंदिर" (अनाथ आश्रम ) आत्मवृद्ध सेवा मंदिराचेकार्यचालूअसताना नातवंडा पासून दूर असलेल्या वृद्धांना आधार मिळावा व अनाथ मुलांना ही या माध्यमातून माया प्रेम करणारेआजी-आजोबा मिळावेत या संकल्पनेतून आत्मा बाल विकास मंदिर,अनाथाश्रमाची स्थापना सन 2021 मध्ये करण्यात आली. आज पर्यंत म्हणजेसन 2022 पर्यंत अनाथ मुलांचे संगोपन आम्ही करत आहोत.
Our Eco Friendly Environments
Why Choose Us
Happy Clients
Our Workers
Vyasan Mukti
Our Experience