About Us

माननीय श्री विक्रम मुरलीधर कातकडे,
( संस्थापक अध्यक्ष विक्रम फाउंडेशन नायगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक )
नमस्कार
मी श्री विक्रम मुरलीधर कातकडे...सामाजिक कार्याची आवड असल्यानेविविध सामाजिक उपक्रम राबवलेतेव्हा समाजासाठी काहीतरी भरीव कार्यकरावे, या हेतूनेसन 2017 साली विक्रम फाउंडेशन ची स्थापना करण्यात आली.

" आत्मा व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र "
आजची तरुण पिढी अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकत चाललेआहे असे निदर्शनात आले, व्यसनामुळे कौटुंबिक आर्थिक सामाजिक स्थिती मध्येहोणारी फडफड बघून अस्वस्थ झालो. त्यासाठी विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून सन 2017 मध्ये आत्मा व्यसनमुक्ती केंद्र व पुनर्वसन केंद्राची स्थापना करण्यात आली. आज पर्यंत म्हणजे 2022 पर्यंत 865 रुग्णांना सेवा देऊन व्यसनमुक्त केली याचा मला मनस्वी अभिमान आहे. " आत्मा वृद्ध सेवा मंदिर " व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून काम करत असताना वृद्ध लोकांचे होणारे हाल -अपेष्टा त्यांची फडफड नजरेस आली, कुटुंब व्यवस्थेचा सर्वात जास्त विघातक परिणाम हा वृद्धांवर झाला म्हणून सन 2020 मध्येआत्म वृद्ध सेवा मंदिराची स्थापना करण्यात आली. आजपर्यंत म्हणजे 2022 पर्यंत 42 वृद्धांची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले. " आत्मा बाल विकास मंदिर" (अनाथ आश्रम ) आत्मवृद्ध सेवा मंदिराचे कार्य चालूअसताना नातवंडा पासून दूर असलेल्या वृद्धांना आधार मिळावा व अनाथ मुलांना ही या माध्यमातून माया प्रेम करणारेआजी-आजोबा मिळावेत या संकल्पनेतून आत्मा बाल विकास मंदिर,अनाथाश्रमाची स्थापना सन 2021 मध्ये करण्यात आली. आज पर्यंत म्हणजे सन 2022 पर्यंत अनाथ मुलांचेसंगोपन आम्ही करत आहोत.
धन्यवाद, आपल्या सावलीत उभा,
माननीय श्री विक्रम मुरलीधर कातकडे

 

 भविष्यातील योजना


आत्मा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल

 ग्रामीण भागातील लोकांची होणारी वैद्यकीय गैरसोय ओळखून अल्पदरात आत्मा मल्टीस्पेशलिटी हॉस्पि टल ची स्थापना लवकरच सुरू करण्यात येणार आहे.


क्रीडा अकॅडमी

तरुणांसाठी खेळाची आवड लक्षात घेता तसेच शारीरिक व्यायाम व्हावा यासाठी क्रिडा अकॅडमी ची स्थापना करण्याचे योजिले आहे.

भरती करिअर अकॅडमी, महिलांसाठी महिला उद्योग

गोशाळा, तरुणांसाठी पोलीस भरती आर्मी भरती करिअर अकॅडमी, महिलांसाठी महिला उद्योग व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, या वरील सर्वबाबींकडे विशेष लक्ष दिले जात आहे.


सांस्कृतिक अकॅडमी

प्रत्येकाला आप-आपली सांस्कृतिक आवड जोपासता यावी यासीठी सांस्कृतिक अकॅडमी या वरील सर्वबाबींकडे विक्रम फाउंडेशन चा प्रवास सुरू आहे.